गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाची हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी | आरमोरी तालुक्यात आज संध्याकाळी विजांचा कडकडाट व गारपिटीसह जोरदार पाऊस पडला. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी जोरदार वादळ आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

आरमोरी शहर व तालुक्यात संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गडचिरोली, चामोर्शी व अहेरी तालुक्यालाही वादळाचा फटका बसला. गडचिरोली-आरमोरी मार्गावरील साखरा-काटली गावादरम्यान वादळामुळे एक मोठे झाड रस्त्यावर कोलमडून पडले. यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प होती.

आज गडचिरोली येथील आठवडी बाजार होता. दिवसभर बाजार सुरळीत होता. परंतु संध्याकाळी अचानक जोरदार वादळ आल्याने भाजीविक्रेत्यांची तारांबळ उडाली. अनेक दुकानांवरील बोर्ड आणि टिनपत्रेही उडाली. सकाळी देसाईगंज तालुक्यालाही पावसाने झोडपले

Leave a Comment