महाबळेश्वर प्रतिनीधी । पाचगणी येथील सेट झवेयीर्स या खाजगी शाळेच्या होस्टेलमध्ये १४ दिवस संस्थात्मक विगीकरन झाल्यानंतर महसुल प्रशासनाकडून वाधवान कुटुंबासह २३ जणांचे क्वारटाईन वाधवान याच्या मालकीच्या “ दिवान व्हीला “ येथे कडेकोट बंदोबस्तात महाबळेश्वर येथे करण्यात आले. सी बी आय कोर्टाकडुन वाधवान बंधुना ५ तारखेपर्यत सातारा जिल्हा न सोडण्याचे आदेश दिले गेले आहेत. पाचगणीच्या सेट झवेयीर्स शाळेच्या होस्टेलमध्ये वाधवान कुटुंबासह २३ जणाचे संस्थात्मक विलगीकरन प्रशासनाकडून करण्यात आले होते.
महसुल प्रशासनाकडून वाधवान कुटुबाकडुन संचार बंदीचे उल्लंघन करुन महाबळेश्वरला प्रवेश केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले होते . मात्र पोलीस प्रशासनाकडून वाधवान कुटुंबावर संस्थात्मक विलगीकरणानंतर कोणती कारवाई करन्यात आली याबाबत समजु शकले नाही. मात्र महसुल विभागाकडुन वाधवान कुटुबाला संस्थात्मक विलगीकरनानंतर महाबळेश्वरच्या स्वमालकीच्या” दिवान व्हीला “ याघरामध्ये होम क्वारटाईन केले आहे. पाचगणीत वाधवान कुचुबासह २३ जणांची वैद्यकीय तपासनी करण्यात आली आहे. पाचगणीहुन महाबळेश्वरकडे रवाना होताना प्रत्येकाच्या हातावर होम क्वारटाईनचे शिक्के देखील मारण्यात आले असल्याची माहीती समोर आली आहे. दोन मोठ्या बसेस तहसिलदार महाबळेश्वर पोलीस व्हॅन ,पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश पवार, सातारा गुन्हे अन्वेषनचे अधिकारी याच्या लवाजम्यासह गाड्याचा ताफ्यासह वाधवान कुटुंबासह २३ जणांना महाबळेश्वर येथील दिवान” व्हील्याकडे “ पाठवण्यात आले
इडीचे दोन अधिकारी पाचगणीत दाखल
साबीआय कोर्टाच्या आदेशानुसार ५ तारखेपर्यत वाधवान यांनी जिल्हा सोडु नये असा आदेश वाधवान बंधुना देण्यात आला आहे . मात्र मुबईच्या इडी कार्यालयातील दोन अधिकारी पाचगणीच्या सेट झवेरीयर्स या होस्टेलमध्ये डेरेदाखल झाले होते . वाधवान बंधुना भेटून इडीची चैाकशी झाल्यावरच महसुल प्रशासनावर पाचगणीतीतुन वाधवान कुटुंबाला होम क्वारटाईनकरीता महाबळेश्वरला हलवले.