वडूज पोलिसांची 21 वाहनांवर कारवाई, 31 हजारांचा दंड वसूल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

शासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केल्यावर वडूज पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांकडून पोलिसांनी सुमारे 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला असून 21 वाहनांवर विविध गुन्ह्यात कारवाई करण्यात आली आहे.

वडूज पोलिस ठाणे हद्दीत उपविभागीय अधिकारी दहिवडी विभाग डॉ. नीलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मालोजीरावराव देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वडूज पोलीस ठाणे, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर, वडूज पोलीस स्टेशन स्टाफ यांनी संयुक्तरीत्या कोरोना पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी चौक वडूज याठिकाणी कारवाई केल्या. लॉकडाऊन दरम्यान मोटार वाहन कायदा कलम प्रमाणे 117 केसेस करून 27 हजार 200 रुपये दंड,  13 जणांवर विना मास्क प्रकरणी केसेस करून 2 हजार 600 रुपये तर सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्यांकडून एक हजार रुपये दंड वसूल केला आहे.

वडूज शहरांमध्ये कोरोना पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणारे २१ वाहने ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. शहरात कडक लॉकडाऊन पार्श्वभूमीवर रूट मार्च काढण्यात आला होता. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करावे व घराबाहेर पडू नये असे आवाहनही केले आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा👉🏽 http://bit.ly/3t7Alba

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like