विद्या बालनसह मराठमोळा वैभव झळकणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र – हिट मराठी चित्रपट देणारा आणि बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका यांसारख्या हिंदी चित्रपटातील वैभवच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. आता वैभव बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत काम करणार आहे. प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये वैभव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.वैभवने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात त्याने बॉलिवूडच्या उपकमिंग प्रोजेक्ट आणि स्टार अभिनेत्री सोबत काम करत असल्याचा खुलासा केला आहे.

https://www.instagram.com/p/B4_nc28p06-/

वैभव सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. वैभवने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या इन्स्टा अपलोडस वरून वैभव सध्या त्रिभंगा या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याचे समजते .

https://www.instagram.com/p/B42dTj8JgIY/

न्यू प्रोजेक्टबद्दल सांगितल्यानंतर वैभवने बॉलिवूड अभिनेत्री काजोलसोबत फोटो शेअर केला आहे आणि काजोलबद्दलचं त्याचं मत व्यक्त केलं आहे.
त्रिभंगा या सिनेमाचे दिग्दर्शन रेणुका शहाणे करत असून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुंबईतील एका कुटुंबाची कथा रेखाटण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/B44OID5pP–/

Leave a Comment