हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फेब्रुवारी महिना म्हटलं कि प्रत्येकाला व्हॅलेन्टाईन डे ची आतुरता असते. जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेन्टाईन डे म्हणून साजरा केला जातो. प्रेमाचा दिवस म्हणून तरुणांमध्ये व्हॅलेन्टाईन डे ची क्रेझ असते. आपला प्रियकर/प्रेयसी यांना या दिवशी गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. भारतातही व्हॅलेन्टाईन डे मुळे संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात तरुणाईमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. दिल्ली, मुंबईसह अनेक मेट्रो शहरांत यंदा व्हॅलेन्टाईन डे निमित्त लाल रंगाचे हार्टचे बॅनर लावण्यात आले आहेत. या हार्ट बॅनरमुळे फेब्रुवारी महिन्यात व्हॅलंटाईन डे ची वातावरण निर्मिती होत असून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र आता अशात याला गालबोट लागणारी एक घटना समोर आली आहे.
काल परवा पर्यंत शहारांतील चौकाचौकात जे हार्टचे बॅनर प्रेमाचा संदेश देत होते त्यांना नख्यांनी ओरबाडल्याचा प्रकार घडला आहे. हे नक्की कोणी आणि का केले असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे. ५ फेब्रुवारी च्या मध्यरात्री हार्टचे बॅनर अशा पद्धतीने ओरबाडण्यात आल्याचं बोललं जातंय. ऐन पौर्णिमेच्या रात्री असे कृत्य कोणी केलं असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.
दिल्ली-एनसीआरच्या रस्त्यांवर दिल्लीवासियांसाठी व्हॅलेंटाईन डे वीक साठी उत्साह निर्माण करणारे सुंदर लाल हृदयाचे बॅनर दिसले. पण आज सकाळपासूनच शहरभरातील या सर्व पोस्टर वरील हृदयाच्या फोटोना नखांनी कोरल्यासारखे चित्र दिसत आहे. एकीकडे व्हॅलेंटाईन डे निमित्त सर्वजण उत्साहात असतानाच या भितीदायक कृतीमुळे मात्र धक्का बसला आहे.
https://www.instagram.com/reel/CoOtaNcqnY_/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वी प्रेमाचं प्रतीक असलेल्या लाल हृदयाचे पोस्टर्स चांगलेच चमकत होते. मात्र हे सर्वच्या सर्व पोस्टर्स वरील heart नखाने कोरल्यासारखे फाडण्यात आले आहेत. व्हॅलेन्टाईन डे जवळ आला असतानाच अशा प्रकारे पोस्टर्सना टार्गेट करण्याचं काम कोणी केलं असेल हा प्रश्न निर्माण झालाय.Valentine Day
https://www.instagram.com/reel/CoOrNalrFyi/?utm_source=ig_web_copy_link
रविवारी (५ फेब्रुवारी) पौर्णिमेच्या रात्री हे बॅनर्स अशा प्रकारे फाडण्यात आल्याच काही जणांनी सांगितलं. या घटनेबाबतचे गूढ वाढत असतानाच देशाच्या इतर भागात देखील अशा प्रकारची कृत्ये घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी अशा नखांनी ओरबाडल्या सारखे हर्टचे बॅनर्स दिसले. केवळ मेट्रो शहरेच नव्हे तर देशातील इतर शहरांमध्येही अशाच घटना समोर आल्या आहेत.
5 फेब्रुवारीला पौर्णिमेची रात्र होती. 6 फेब्रुवारीला हर्टचे बॅनर्स नखांनी ओरबाडल्या सारखे फाडण्यात आले. यामुळे याचा पौर्णिमेच्या रात्रीशी काही संबंध तरी नाही ना? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या अनाकलनीय घटनेमागील सत्य नेमकं काय आहे? हे येणारी वेळच सांगेल.