हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Valentine Day – अनेकजण फेब्रुवारी महिन्याची आतुरतेनं वाट बघत असतात. कारण हा महिना प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या महिन्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. या दिवशी बरेचजण आपल्या पार्टनरला लाल गुलाबांचा गुच्छ, आवडत्या चॉकलेटचा बॉक्स आणि रोमँटिक डिनर डेटला घेवून जाणं असं काही करत असतात. पण यापेक्षा जर काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला ऊटी, मनाली अशा अनेक ठिकाणी घेऊन जाऊ शकता. तर चला अशाच भारतातील खास ठिकाणांबद्दल माहिती जाणून घेऊयात. जिथे तुमचा आनंद दुप्पट होईल.
ऊटी (Valentine Day)–
ऊटी, तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यातील एक शहर आहे. हनिमूनर्स हेवन म्हणून ओळखले जाणारे ऊटी हे व्हॅलेंटाईन डे साठी एक उत्तम ठिकाण ठरू शकते. निलगिरी पर्वत ट्रेकींग आणि लेक सायकलिंग, बोटिंग ऑर लेक साइड पिकनिक, प्लॅन्टेशन टूर, प्यांटन कॅबिन मध्ये निवास अश्या सुंदर ठिकाणी तुम्ही तुमचे खास क्षण तुम्ही घालवू शकता.
चंपानेर-पावागड –
गुजरातचे चंपानेर-पावागड हे सुद्धा व्हॅलेंटाईन वीक साठी एक उत्तम ठिकाण ठरू शकते. चंपानेर-पावागड हे जागतिक वारसा असलेले स्थळ आहे, ज्यामध्ये किल्ले, प्राचीन मंदिरे आणि सुंदर पर्वत देखील आहेत. आपल्या जोडीदारासोबत या नैसर्गिक वातावरणात तुम्ही या सुंदर ठिकाणी (Valentine Day) जावून मनसोक्त सफर करून आनंद घेवू शकता.
मनाली –
मनाली, हिमाचल प्रदेशातील एक अत्यंत लोकप्रिय हिल स्टेशन आहे आणि व्हॅलेंटाईन डे साठी हे ठिकाण खूप रोमँटिक (Valentine Day)आहे. निसर्गाची अप्रतिम सुंदरता, बर्फाच्छादित पर्वत, आणि शांत वातावरण तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत खास क्षण घालवण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. अल्स्ट्रा-रोमँटिक वॉक – बोगतू/ मणाली वॉक, सोलांग व्हॅली – बर्फाची मजा, हिडिम्बा मंदीर आणि बर्फात फिरणे, मनाली लेक, रोहतांग पास इत्यादी ठिकाणी भेट देवू शकता.
लॅन्सडाउन –
जर तुम्ही शांततेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात रोमँटिक क्षण घालवण्याचा विचार करत असाल, तर लॅन्सडाउन तुम्हाला सर्वोत्तम अनुभव देईल. या ठिकाणी बर्फ, जंगले, आणि सुंदर वातावरण आहे. पॅन्थलू हिल, तिळपतरी वॉटरफॉल, स्टेडियम रोड आणि कॅन्टोनमेंट एरिया, लॅन्सडाउन व्हॅल्ली – बोटिंग,कैम्पिंग आणि ट्रेकिंग या ठिकाणी जावून तुम्ही लॅन्सडाउनचा सुंदर अनुभव घेवून व्हॅलेंटाईन वीक स्पेशल बनवू शकता.
उदयपूर (Valentine Day)–
सरोवरांचे शहर म्हणून ओळखल जाणार उदयपूर भरपूर रोमँटिक ठिकाणांसह खऱ्या अर्थाने प्रेमाचे शहर आहे. लेक पॅलेसपासून सज्जन गढ पॅलेसपर्यंत, लेक पिचोला ते दूध तलाई आणि सहेलियों की बारीपर्यंत, व्हॅलेंटाईन डेला भेट देण्यासाठी इथे अनेक ठिकाणं आहेत.