Vande Bharat Express आता ‘या’ दिवशी धावणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) प्रवाशांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. २४ तास लोकांच्या सेवेत असणारी हि ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावते हे आपण जाणताच, परंतु आता गांधींनगर- गुजरात या वंदे भारत ट्रेनच्या प्रवासात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आत ही रेल्वे बुधवारी धावणार नाही. याबाबत रेल्वेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, गांधीनगर- मुंबई जाणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आता बुधवार सोडून सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार तत्काळ प्रभावाने धावणार आहे. या पूर्वी ही एक्सप्रेस ट्रेन रविवार सोडून इतर सहा दिवस धावत होती. परंतु आता रविवार ऐवजी ती बुधवारी धावणार नाही. त्यामुळे प्रवास करताना तुम्ही ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा.

दरम्यान, गांधीनगर-मुंबई मार्गे धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन आहे. अपघात होऊ नये म्हणून या ट्रेन चा वेग हा भारतातील बाकीच्या एक्सप्रेस गाड्यांपेक्षा कमी असतो. वंदे भारत ट्रेनचा सरासरी वेग हा 64 किमी प्रतितास ते 95 किमी प्रतितास असा ठेवण्यात आलाय. यासाठी प्रवासी ऑनलाइन किंवा ऑफलाइन तिकीट काढून प्रवास करू शकतात. गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता देशातील अनेक राज्यामध्ये वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली आहे.