हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजच्या काळात अनेकांना व्यवसाय, नोकरी किंवा इतर कारणांमुळे अनेकवेळा स्तलांतर करावे लागते. त्यामुळे ते त्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन राहतात. यादरम्यान अनेक घरमालक भाड्याने देण्यासाठी बांधलेल्या घरांबाबत वास्तूशास्त्राचे (Architecture) नियम पाळत नाहीत. त्यामुळे त्या घरात वास्तुदोष (Architectural defect) निर्माण होतात आणि त्याचा त्रास (Architectural defect)त्या भाडयाच्या खोलीत राहणाऱ्या कुटुंबाला होतो. भाडेकरूंना भाड्याच्या घरात कोणतीही तोडफोड करून रचना बदल करता येत नाहीत. मात्र, त्यांनी इतर काही बदल केल्यास घरातील वास्तू दोष (Architectural defect) दूर होऊ शकतात. त्या कोणकोणत्या टिप्स आहेत ते आपण पाहूया….
1) तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य भाग रिकामा राहील, याची काळजी घ्या. याशिवाय घराच्या नैऋत्य भागात सोफा किंवा बेडसारख्या जड वस्तू ठेवू शकता.
2) घरामध्ये पलंग ठेवताना नेहमी लक्षात ठेवा की, तुमच्या पलंगाचा पुढचा भाग दक्षिण दिशेलाच असावा. झोपताना तुमचे पाय नेहमी उत्तर दिशेला आणि तुमचे डोके पूर्व दिशेला असावे.
3) भाड्याच्या घरात देव्हारा असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या भाड्याच्या घरात देव्हारा तयार करणार असाल तर तो घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावा. असे केल्याने तुमच्या धन-संपत्तीमध्ये वाढ होऊ (Architectural defect) शकते.
4) वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पाण्याचा अपव्यय करणे अशुभ (Architectural defect) मानले जाते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या घरातील पाण्याचा कोणताही पाइप गळत नाही ना याची खात्री करून घ्यावी.
5) घरात प्रवेश करताना पहिली भिंत जी दिसते ती कधीही रिकामी ठेवू नका. त्या भिंतीवर तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवा किंवा गणपतीचा फोटो लावा. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल.
(सूचना : वरील दिलेली माहिती वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. हॅलो महाराष्ट्र वरील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही.)
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर