फडणवीस लग्नाला उतावीळ, पण त्यांना नवरीचं मिळत नाहीये- प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 औरंगाबाद । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास आघाडीचे सरकार पाडून पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा प्रयत्न भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करत आहेत का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत. मात्र त्यांना नवरीच मिळेना अशी त्यांची अवस्था झालीय असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाउनला विरोध करणारीही भूमिका मांडली. ५ टक्के लोकांसाठी ९५ टक्के लोकांना वेठीला धरणं चुकीचं आहे. लोकांनी लॉकडाउनचे नियम तोडून आपले व्यवहार सुरळीत करावेत अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा मांडली. लॉकडाउन असाच कायम राहिला तर करोनापेक्षा लोक उपासमारीने मरतील असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. लॉकडाउनचा सगळ्यात मोठा फटका हा कामगार आणि पारंपारिक व्यापाऱ्यांना बसला आहे त्यांना सरकारने मदत केली पाहिजे अशीही मागणी त्यांनी आज केली.

लॉकडाऊनच्या सुचना मान्य न करता आधीसारखंच जीवन सुरू करा असे देखील आंबेडकर म्हणाले. आमचा लॉकडाऊनला पाठिंबा नाही हे दर्शवण्यासाठी ज्या झेंड्याला तुम्ही मानत असाल तो झेंडा लोकांनी घरी, गच्चीवर फडकवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. तिरंगा फडकवलात तर अधिक चांगलं होईलं असेही ते म्हणाले. असं आवाहन केल्याने माझ्यावर गुन्हा दाखल करा अटक करा, मी घाबरत नाही असेही ते म्हणाले. कोरोना संदर्भात सत्य स्थिती मांडायला राज्य किंवा केंद्र शासनाकडे राजकीय हिम्मत आणि नेतृत्व नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. लॉकडाऊन चक्रामध्ये केंद्र आणि राज्य हे दोन्ही शासन स्वतःहून अडकलेत. बाहेर पडण्याचा रास्ता त्यांना दिसत नाही. सर्वसामान्य जनतेनेच शासनाला रास्ता दाखवण्याची गरज आहे. 3 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने सार्वजनिक वाहतूक सुरू करा असं आवाहन त्यांनी यावेळी शासनाला केलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment