वेचले सोसायटीवर अजिंक्य पॅनेलची बिनविरोध सत्ता

सातारा | सातारा तालुक्यातील वेचले, शिवाजीनगर गावांसाठी संयुक्त असलेल्या वेचले विकास सेवा सोसायटीवर अजिंक्य पॅनेलने बिनविरोध सत्ता प्रस्थापित केली. चेअरमनपदी प्रमोद जाधव तर व्हा. चेअरमनपदी राहुल खामकर यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वेचले सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व 13 जागा बिनविरोध निवडून आल्या. चेअरमन जाधव, व्हा. चेअरमन खामकर यांच्यासह अजिंक्य पॅनेलचे रविंद्र चव्हाण, राजेंद्र भोसले, गणपत चव्हाण, श्रीकांत जाधव, प्रल्हाद पवार, जयराम धनवडे, रघुनाथ कुंभार, वंदना चव्हाण, सुनंदा भोसले, संजय जावळे, कृष्णत जाधव हे सदस्य बिनविरोध निवडून आले.

सोसायटीची निवडणूक बिनविरोध करून वेचले गावाने आदर्श निर्माण केला आहे. सभासद आणि ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून सोसायटीच्या माध्यमातून आदर्श कारभार करा आणि सभासद शेतकऱ्यांची उन्नती साधा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने केले.