Vi ला मिळाले आयपीएलच्या लाईव्ह ब्रॉडकास्टचे को-स्पॉन्सरशिप हक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टेलीकॉम ऑपरेटर कंपनी वोडाफोन-आइडिया (Vi) Dream11 IPL 2020 ची को-स्पॉन्सर बनली आहे. IPL 2020 ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून यूएई मध्ये होणार आहे. ही माहिती कंपनीने शनिवारी एका प्रेस रिलीज द्वारे दिली आहे. टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने काही दिवसांपुर्वीच आपले रिब्रँड करत नवीन नाव आणि लोगो जारी केला होता.

व्होडाफोन-आयडियाचे आधीही थोड्याफार प्रमाणात आयपीएलमध्ये सहभागी होते. मात्र दोन्ही कंपन्यांचे 2018 विलिनिकरण झाल्यानंतर पहिल्यांदाच व्ही ब्रँड अंतर्गत आयपीएलला को-स्पॉन्सर करणार आहे.

19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आयपीएलच्या लाईव्ह ब्रॉडकास्टचे को-स्पॉन्सरशिप हक्क मिळाले आहेत. दरम्यान याआधी ड्री-11ने 222 कोटी रुपयांमध्ये आयपीएल 2020 ची स्पॉन्सरशिप मिळवली होती. Vi आणि स्टार स्पोर्ट्समध्ये झालेल्या करारामधील आर्थिक आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.

Dream11 ने 222 कोटी रुपयांमध्ये IPL 2020 ची स्पॉन्सरशिप मिळवली होती. याआधी भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे विवोला स्पॉन्सरशिप देण्यास विरोध होत होता. त्यामुळे बीसीसीआयने यंदा ड्रिम ११ या कंपनीला आयपीएलचं टायटल स्पॉन्सरशिप दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

Leave a Comment