शिवसेनेतील एका मुस्लीम मावळ्याने उद्धव ठाकरेंसाठी स्वतःच्या रक्ताने लिहिलं पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिर्डी : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून (shiv sena) बंड केले. त्यानंतर त्यांनी सरकारचा पाठिंबा काढला आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर त्यांनी फडणवीस यांच्या साथीने राज्यात शिंदे सरकार स्थापन केले. शिवसेना (shiv sena) फुटल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पक्ष फुटला, नेते विभागले तसं शिवसैनिकही दुभंगले गेले. तसेच अनेक शिवसैनिकांना शिवसेनेतील (shiv sena) फूट असह्य झाली आहे. यादरम्यान आता राहिलेली शिवसेना (shiv sena) वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभरात संवाद यात्रा काढली आहे.

या संवाद यात्रेच्या निमित्ताने ते शिर्डीला गेले होते. आदित्य ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यात शिवसेनेच्या (shiv sena) एका मुस्लीम मावळ्याने स्वतःच्या रक्ताने आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं. शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं त्याने पत्रात म्हटलं आहे. हे पत्र त्याने आदित्य ठाकरे यांना दिलं. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा आणि नंतर शिर्डीत कार्यकर्तांशी संवाद साधत या दौऱ्याची साईदर्शनाने सांगता झाली. मात्र यादरम्यान मुस्लीम कार्यकर्त्याने उचललेल्या या पावसामुळे लोक भावुक झाले.

शिवसेनेतील (shiv sena) तब्बल 50 आमदार फुटल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र याचा सर्वाधिक धक्का हा सर्वसामान्य शिवसैनिकांना बसला. अनेक वर्षांपासून आपल्या नेतृत्वासाठी अहोरात्र झटणाऱ्या या शिवसैनिकांना आपल्याच कुटुंबाचे दोन भाग होताना पाहावे लागले. नेकांना शेवटपर्यंत वाटत राहिलं की, गेलेले आमदार परत येतील. मात्र तसं काहीच झालं नाही. त्याउलट एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सध्या या मुस्लिम शिवसैनिकाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
जनतेने एकदा ठरवले तर भले भले घरी बसवतात; अजित पवारांचं सूचक विधान

अमेरिकन बाजारातील घसरणीने मोडला 50 वर्षांचा विक्रम !!!

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड

एकनाथ शिंदेनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

Leave a Comment