जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्याचा व्हिडिओ शेअर करत ऊर्जामंत्र्यांनी दिली शाबासकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | १२ ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, नवी मुंबई मधील वीजपुरवठा अचानक पूर्णपणे खंडित झाल्याने मुंबई आणि परिसरात खळबळ उडाली होती. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झालं होतं. मुंबईचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचा-यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केलं. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी त्यांचा व्हिडिओ शेअर केला असून कर्मचाऱ्यांना सलाम ठोकला आहे.

नितीन राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुंबईला अखंडीत वीज पुरवठा करणा-या चार मुख्य वाहिन्यांपैकी एक असलेल्या कळवा- तळेगाव या वीज वाहिणीचा तुटलेला कंडक्टर दुरूस्त करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी लोणावळ्याच्या दुर्गम व अतिखोल भागात वादळ आणि वाऱ्यात जीवावर उदार होऊन काम पूर्ण केले. त्याबद्दल सलाम”.

मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं ट्विट नितीन राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली होती. नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटसंबंधी पत्रकारांशी बोलताना मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं साधी बाब नाही, त्यामुळेच आपण घातपाताची शक्यता वर्तवली असल्याचं सांगितलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment