कोण मारणार ‘वणी विधानसभा’ क्षेत्रात बाजी; निवडणूक स्पेशल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ प्रतिनिधी । स्पेशल स्टोरी
यवतमाळ पासून 107 किमी दूर असलेले जिल्ह्याचे शेवटच्या टोकाचे विधानसभा क्षेत्र म्हणजे वणी. वणी शहराला “ब्लॅक डायमंड सिटी” नावाने ओळखल जातं, कारण या क्षेत्रात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. वणी, मारेगाव, झरी असे तीन तालुके या विधानसभेच्या क्षेत्रात येतात. आता निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. प्रत्येक जण आपल्याच पक्षाचा झेंडा फडकणार असा, तर प्रत्येक उमेदवार आपणच विजयी होणार असा दावा करत आहेत.

वणी विधानसभा जागेचा पूर्व इतिहास पहिला तर, या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे वामनराव कासावर 15 वर्ष सत्तेत होते, तर 2004 ते 2009 ला  शिवसेनेचे विश्वास नांदेकर होते आमदार होते. त्यानंतर  2009 ला बाजी मारत पुन्हा वामनराव कासावर निवडून आले होते. काँग्रेस ला वैतागून 2014 ला नवा चेहरा म्हणून आणि  युती तुटल्याने भाजपचे विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना जनतेने विजयी केले होत. आत्तापर्यंत या सर्वच राजकीय मंडळींनी वणीचा काय विकास केला तसेच नव्याने निवडणूक रिंगणात उतरणाऱ्यांची स्थिती काय आहे याबाबतचा घेतलेला हा आढावा..

आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार

आमदार बोदकुरवार यांनी 1994 पासून राजकारणाची सुरुवात केली असून 25 वर्ष पासून पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. महराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य असल्याने त्यांना भाजपचे तिकीट नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी दिल. युती तुटल्याने हा नवा चेहरा मतदारसंघाला मिळाला आणि ते विजयी झाले.  त्यांनी ग्रामीण भागातील रस्ते, 70 गावातील पाण्याचा प्रश्न, नळ योजना, वणी परिसरात उद्यान अशी विविध कामे केलीयेत, तसेच खनिज निधी 66 टक्के आणला असून, आत्तापर्यंत सुमारे 677 कोटी चे विकास काम केल्याचा दावा त्यांच्या कडून करण्यात आला.

वामनराव कासावर

वामनराव कासावर यांनी 15 वर्ष काँग्रेस कडून सत्ता भोगली आहे. 2004 मध्ये त्यांचा पराभव झाला, मात्र 2009 मध्ये पुन्हा विजयी झाले. कासावर जेव्हा प्रथम आमदार झाले त्यावेळी पाटण ते वणी फक्त 6 किमी डांबर रस्ता होता. काँग्रेस ने सर्वत्र वणी विधानसभेचा विकास केला असून रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य अश्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहे. बाकीच्यांनी फक्त नाम मात्र करून स्वतःच नाव उद्यास आणले. वामनराव कासावर यांनी सूत गिरणीची मागणी करून ती उभी केली. मात्र सुरू झाली नाही. ही मतदारांना खूप खंत आहे. राज्याला 40 टक्के खनिज निधी मिळतो त्यातला 10 टक्के वणी विधानसभा साठी खेचून आणला, हे जरी खरे असले पण तो गेला कुठे हा प्रश्न उपस्थित होते.  झरी तालुका हा आदिवासी भाग आहे येथे  संपूर्ण तालुक्यात रस्ता तयार केले. याही वर्षी जनता भाजपला नाराज झाल्याने विजय काँग्रेस चा होणार अस विश्वास त्यांना आहे.

माजी आमदार विश्वास नांदेकर

शिवसेनेचे विश्वास नांदेकर हे तडफदार नेते म्हणून ख्याती आहे. त्यांच्या काळात अवैध व्यवसाय बंद होते. ग्रामीण भागात सेनेची पकड मजबूत असून लोकसभेला सेनेचे शक्ती प्रदर्शन दमदार होते. नौकरी करणारे यांच्यावर अल्पसे नाराज असतात कारण जनतेचे काम झाले नाही तर शासनाला धारेवर धरतात त्यामुळे सगळ्यांना त्यांची धास्ती असते. युती झाल्यास 2004 ला विजयी झालेले सेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांना उमेदवारी नक्की मिळेल यात शंका नाही.

डॉ महेंद्र लोढा

नव्यानेच राजकारणात आलेले डॉ महेंद्र लोढा यांनी आपली पकड चांगली मजबूत केली आहे. झरी तालुक्यातील वरपोड या गावाचा विकास करून भाजप,काँग्रेस व जनतेत आपला ठसा उमटऊन  समाज कार्य व राजकारणाची सुरुवात केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस झाले . अनेक नागरिकांना त्यांनी मदत केली महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात, शेतकऱ्यांना साठी उपोषण केल्याने महाराष्ट्र ते चांगलेच प्रसिद्ध झाले. लोढा याना तिकीट मिळवण्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरूये. लोढानी वेगवेगळ्या कार्य द्वारे तिन्ही तालुक्यात स्वतः ला सिद्ध करून जनतेच्या मनात घर केलय पण खरंच जनता यांना भावी आमदार म्हणून स्वीकारतील..? अनेकदा जनतेच्या मनात असा प्रश्न उपस्थित होतो आहे की विधानसभा निवडणुकीची तयारी साठीच  सर्व आंदोलने आणि समाज कार्य सुरुये त्यामुळे जनता मतदान करेल का..?  हे निकाल नंतर स्पष्ट होणारये….

संजय देरकर

संजय देरकर यांच्या बाबतीत जनता नेहमी म्हणत असते निवडणूक आली की एखादा विषय घेऊन निवेदन, आंदोलन करून प्रकाशात येतात. मग मात्र जनतेच्या हक्कासाठी कुठे जातात हे कोणालाच माहीत नाही. असे  नशीब अजमवणारे संजय देरकर  गेल्या अनेक विधानसभेला कधी अपक्ष तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उभे राहतात, पण त्यांना कायम पराभवच पत्करावा लागला आहे. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकला आणि उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याचे फोटो प्रसिद्ध झाले त्यांनतर मुंबई वारी सुरू झाली आणि सेनेत जाणार याची जोरदार चर्चा सुरू झाली. पण त्यांचं गणित काही जमलं नाही. आता  काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू असल्याची चर्चा सुरूये. उमेदवारी नाहीच मिळाली  तर पुन्हा अपक्ष लढणार यात किंचितही शंका नाही.  मात्र अपक्ष किंवा कोणत्या पक्षा कडून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्या नंतर 30,000 च्या वर मतदान मात्र नक्कीच घेतात कारण त्यांचे चाहते मतदाता पक्के आहेत. त्यामुळे दरेकर यांना नजर अंदाज करणे इत्तर उमेदवारांना परवडणार नाही आहे.

मनसे

सध्या मनसे शांत दिसत आहे निवडणुकीच्या रिंगणात येणार की नाही अशी शंका तालुक्यातील मतदारांना आहे. या भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जनतेचे प्रश्न नेहमी सोडवत न्याय मिळवून देण्यासाठी सतत लढा देत असते. मात्र जनता त्यांना निवडणुकीत मतदान करत नाही याचे कारण काय..?  हे मात्र गुपितच आहे असं म्हणावं लागलं. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर याना उमेदवारी मिळेल मात्र अल्प कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर विजयी होतील का..? मनसे वणी विधानसभा क्षेत्रात प्रत्येक घरात का नाही पोहचली याचे चित्र निवडणुकीचा निकाल नंतर दिसेलच.

Leave a Comment