धुळ्यात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुसच, सेनेच्या बॅनर वरून भाजप कार्यकर्त्यांचे फोटो गायब  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी । धुळ्यात शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या सभे दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वावडे असल्याच उघड झालं आहे. आदित्य ठाकरे ज्या मंचावरून मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्या मंचावर लावलेल्या बॅनरवर भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचा फोटो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावण्याच टाळलं.

परंतु सभा सुरू होण्यापूर्वीच भाजप पदाधिकारी सभेसाठी उपस्थित झाले असता, त्यांनी शिवसेनेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर गडबडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्याच बॅनरवर अखेर भाजप जिल्हाध्यक्षांचा फोटो वरून चिपकवला. आणि त्यांची नाराजी दूर केली.

भाजप शिवसेना महायुती दरम्यान भाजपचे वर्चस्व असणाऱ्या धुळे शहर मतदार संघात शिवसेनेस जागा सुटल्यानं भाजपमध्ये आधीच नाराजी असून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजप अधिकाऱ्यांचे फोटो लावण्यास कुचराई केली.त्यामुळं भाजप शिवसेनेस युतीधर्म पाळून शिवसेनेस मदत करेल का? हा प्रश्न  उपस्थित झाला आहे.

Leave a Comment