गोपीनाथ मुंडेना पाडणारा ८२ वर्षांचा कार्यकर्ता संभाळतोय धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा..!!

बीड प्रतिनिधी। परळी रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांचा पराभव करणारी व्यक्ती आज धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा आहात घेवून मतदारसंघ पिंजून काढत आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी परळी मतदारसंघात फिरणारे माजी आमदार पंडितराव दौंड यांची परळी मतदारसंघात वेगळी ओळख आहे. १९८५ साली परळी रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे याना ३५०० एवढ्या मताधिक्याने पराभूत करून विजय खेचून आणला होता. त्यावेळी महाराष्ट्रातही याच निवडणुकीची चर्चा झाली होती. तेच पंडितराव दौंड आज धनंजय मुंडेच्या सोबत लढत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रचाराची रणधुमाळी पेटली आहे. परळी मतदारसंघांमध्ये मुंडे बंधू-भगिनींची लढत महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत आहे. या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. परळी मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपासह बेरीज- वजाबाकीचे राजकारण करत आहेत. यासोबतच या मतदारसंघात आपण किती वरचढ आहोत हे दाखवण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघातील कॉंग्रेसचे वजनदार नेते टि.पी मुंडे यांचा भाजपा प्रवेश घेतल्यानंतर वातावरण आणखीनच तापलेलं आहे. दुसरीकडे याच परळी मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांना चितपट करणारे माजी आ.पंडितराव दौंड हे धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी वयाच्या ८२ व्या वर्षी पुन्हा एकदा प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. गावातील लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनीही मोर्चे बांधणी सुरु केली आहे. गोपीनाथ मुंडे यांना पराभूत केलेली रणनीती आताही लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न मतदारसंघात सुरू आहे.

या मतदारसंघात दौंड यांचा खूप मोठा जनसंपर्कही आहे. त्याबरोबरच जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नेटवर्क असलेले दौंड हे गोपीनाथ मुंडेचे जवळचे नातेवाईक आहेत. १९८५ साली पंडितराव दौंड आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ३५७१८ मतदान घेऊन दौंड विजयी झाले होते. यावेळी गोपीनाथ मुंडेना ३१०६७ इतकं मतदान मिळालं होतं. त्यावेळचा विजय आजही सर्वांच्या लक्षात आहे. कारण गोपीनाथ मुंडे यांनी हावडा फेम बाबुराव आडसकर यांना १९८० साली रेनापुर परळी मतदारसंघांमधून चितपट केले होते. रेणापूर मतदारसंघांमध्ये अडसकर यांना पडणारा पट्ट्या कोण अशी चर्चाही त्यावेळी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना पाडणारा पठ्ठ्या कोण तर पंडितराव दौंड यांचं नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आज प्रचार करत असताना जुने डावपेच आखत, पुन्हा एकदा नव्या पोरांना आशीर्वाद देत, नव्या पोरांना साथ द्या असे आवाहन ते करत आहेत. त्यांचा मुलगा संजय दौंड हा जिल्हा परिषद सदस्य आहे. हे पितापुत्र धनंजय मुंडेंना विजयाची लक्ष्मणरेषा पार करून देणार का? याच उत्तर येणारा काळच देईल.

इतर काही बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com