परभणी जिल्ह्यात गामपंचायती जोडल्या जाणार वेगवान इंटरनेटने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । संपूर्ण राज्यात भारतनेट-महानेट प्रकल्प् महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यांत येत असून या प्रकल्पा्द्वारे परभणी जिल्हाातील ४ तहसिल कार्यालये व त्यांअंतर्गत येणारे ४२८ ग्रामपंचायतींना ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडले जाणार आहेत. ग्रामस्तवरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देऊन त्यांना जगाशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारव्दारे हा उपक्रम सुरु केला आहे.

याच यानुषंगानं जिल्हातील ‘भारतनेट’ या उपक्रमाच्या दुस-या टप्यातील कामाचा शुभारंभ तहसिल कार्यालय परभणी येथे शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांचे हस्ते करण्यात आला. या प्रकल्पात परभणी, गंगाखेड, जिंतूर तसेच सेलु तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. उर्वरीत ४ तालुक्यात १८०० कि. मी. अंतर केबल टाकून ४२८ ग्रामपंचायती जोडण्यात येणार असून हे काम जिल्ह्यात पूर्ण करण्यासाठी शासना व्दारे आयटीआयएल या कंपनीची निवड केलेली आहे.

Leave a Comment