३२ दिवस घरी न जाता ‘या’ शिवसैनिकाने वाटले २२८ डाॅक्टरांना स्वखर्चाने PPE किट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यात कोरोनामुळे सध्या भीषन परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकार कोरोनाशी उत्तमरित्या दोन हात करत आहे. मात्र तरिही राज्यात डाॅक्टरांना पुरेशा प्रमाणात पीपीई किट मिळालेल्या नाहीत. यापार्श्वभुमीवर ३२ दिवस घरी न जाता सातार्‍यातील एका शिवसैनिकाने तब्बल २२८ डाॅक्टरांना स्वखर्चाने PPE किटचे वाटप केले आहे.

कोरोनासारख्या भीषण परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यातील डाॅक्टर नर्स यांना स्वखर्चाने PPE(Personal Protection Equepement) किट पोहच करण्याचे काम साता-याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव हे गेली ३२ दिवस अहोरात्र करत आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी डाॅक्टर, पोलिस, प्रशासक अशी यंत्रणा काम करित असताना लोकप्रतिनिधी मात्र घरातून फेसबुक लाईव्ह या पलिकडे जात नाहीत मात्र साता-यात एक अवलिया गेल्या ३२ दिवसांपासुन घरदार सोडुन डाॅक्टर व नर्स यांच्या सुरक्षेसाठी झटतोय. त्यामुळे जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ना कोणती प्रसिद्धी ना‌ फोटोग्राफी ….! सकाळी लवकर उठुन स्वत: स्वयंपाक करुन गाडी घेऊन हि व्यक्ती सातारा जिल्ह्यातील शासकिय रुग्णालयात डाॅक्टरांना PPE किटचे वाटप करताहेत. नाशिक येथे स्वत: जाऊन त्यांनी अत्यंत चांगल्या दर्जाचे ३०० किटस आणले आहेत.

खंडाळा महाबळेश्वर , पाचगणी, सातारा, कोरेगांव, कराड यासारख्या शासकिय रुग्णालयात जाऊन या किटचे अत्तापर्यंत २२८ डाॅक्टरांना वाटप करण्यात आले आहे. शासनाने अजुनही  PPE किट डाॅक्टरांना व नर्स यांना न पुरविल्याने मोठी अडचण निर्माण होत असल्याचे वैदयकिय ‌अधिकारी सांगत आहेत. या मदती बद्दल डाॅक्टरांनी पुरुषोत्तम जाधव यांचे आभार मानले आहेत.

[youtube https://www.youtube.com/watch?v=lXTlynQEYgI&w=560&h=315]

Leave a Comment