‘वणी विधानसभा’ क्षेत्रात सप्तरंगी लढत; दिगग्ज नेते ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ प्रतिनिधी। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. वणी विधानसभा जागेकरिता दिग्गजांसोबत बंडखोरांनी देखील मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता वणी विधानसभा मतदार संघात सप्तरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातील एकूणच चित्र पाहत, उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेल्या काही राजकीय नेत्यांनी अपक्ष का होईना पण आपला हट्ट न सोडता उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, या उमेदवारांवर एक नजर टाकल्यास काल ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे प्रदेश सरचिटणीस डॉ.महेंद्र लोढा यांना पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची अशा होती. परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली. शेवटी त्यांनी हार न मानता ‘वंचित बहुजन आघाडी’ कडून आता उमेदवारी अर्ज दाखल केला.

राज्यात भाजप शिवसेना महायुती जाहीर झाल्यानंतरही दोन्ही पक्षात बंडखोरी पहायला मिळत आहे. वणी विधानसभा क्षेत्र सुद्धा त्याला अपवाद राहिले नाही आहे. भाजपा कडून विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी अर्ज भरला असला तरी, येथील शिवसेना जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी भगवा झेंडा पकडून आपल्या कार्यकर्त्यांसह ‘अपक्ष’ उमेदवारी अर्ज दाखल करून आपली ताकत दाखवली. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी देखील मोठे शक्तिप्रदर्शन करत आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल केले. तसेच ‘काँग्रेस’चे मुरब्बी नेते आणि माजी आमदार वामनराव कासावर यांनी देखील ‘शक्ती प्रदर्शन’ करून अर्ज दाखल केला.भाजपा कडून विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी अर्ज भरला तर

या वेळेस सुनील कातकडे , संजय देरकर हे अपक्ष उमेदवार नामांकन दाखल केले. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे ‘वणी विधानसभा क्षेत्रा’त या वर्षी सतरंगी निवडणूक होणार असल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान सगळेच नेते आपल्या क्षेत्रात उत्तम कार्य करत असून सर्वांकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि ताकद आहे. त्यामुळे निकालानंतर कोणाचा झेंडा आणि वर्चस्व दिसेल याची उत्सुकता जिल्ह्यामध्ये लागली आहे.

Leave a Comment