Wednesday, March 29, 2023

विजय देवरकोंडा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण !!!

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिअर कॉम्रेड,अर्जून रेड्डी, या सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमधून अभिनयाची छाप सोडणारा दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आता लवकरच एका हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात तो बॉलिवूडमधील चंकी पांडे यांची कन्या असलेल्या अनन्या पांडे हिच्या समवेत रोमान्स करताना दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच आपण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे संकेत विजय देवरकोंडा याने दिले होते. आता त्याच्या पहिल्या बॉलिवूडपटाचं शुटिंग हे सुरू होत आहे.मात्र या सिनेमाची अधिकृत घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही. या सिनेमाचं नाव फायटर असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हे पुरी जगन्नाथ हे करणार असल्याचं समोर आलंय. या सिनेमात विजय देवरकोंडाबरोबर कोणती अभिनेत्री दिसणार याविषयीची चर्चा बरेच दिवस झाले सुरू होती. मात्र, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता चंकी पांडे यांची कन्या अनन्या हि विजयसोबत दिसणार आहे.

- Advertisement -

या सिनेमाचं शुटिंग मार्चनंतर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याचं समजते. अनन्या पांडेला विजय देवरकोंडासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळेच तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचं, सूत्रांनी म्हटलं आहे.सुरुवातीला या सिनेमात अभिनेत्री अनन्या पांडेऐवजी श्रीदेवीयांची मुलगी जान्हवी कपूर दिसणार होती. मात्र, ऐनवेळी तिच्या ऐवजी अनन्या पांडेची निवड या भूमिकेसाठी करण्यात आली.