अहमदनगर प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.पक्षश्रेष्टींकडे सुपूर्द केला आहे. आणि त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याचं समजत आहे.
या संपूर्ण घटनेचे अहमदनगर च्या राजकारणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.
नुकतच सुजय विखे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
त्यांनतर राधाकृष्ण विखे काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर विखे यांनी हा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे दिला आणि यानंतर ते पुत्र सुजय चा प्रचार करणार का याकडे हि सर्वांचं बारीक लक्ष असणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते तर धनंजय मुंडे हे विधानपरिषदेचे नेते होते