चांगल्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांसह आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रतिमेश गोंधळे

मिरज तालुक्यातील खंडेराजुरी ते गांधीनगर या रस्त्याचे आत्तापर्यंत कोणतेही काम करण्यात आलेले नाही. देशाच्या स्वातंत्र्यापासून दुर्लक्षित असलेला रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. खंडेराजुरी ते गांधीनगर मोरे वस्ती हा अडीच किलोमीटरचा रस्त्यासाठी गेल्या 40 वर्षापासून नागरीक मागणी करीत आहेत.

रस्ता हा शासन दप्तरी नोंद आहे. डांबरीकरणाठी नागरिक, शेतकर्‍यांचा अडथळा नाही. देश स्वातंत्र्यात येवून इतकी वर्षे होवूनही अद्यापपर्यंत सोयी सुविधा मिळालेल्या नाहीत. आदिवासी भागासारखी अवस्था झाली आहे. वाडी वस्तीपर्यंत येण्यास रस्ता नाही. अत्यावश्यक काळात रुग्णसेविका सुध्दा येवू शकत नाही. त्यामुळे गरोदर महिला, वयोवृध्द रुग्णांना नाहक त्रास करावा लागतो. येथील गांधीनगर या ठिकाणी 700 ते 800 इतकी लोकसंख्या आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी असून येथे सुमारे 40 ते 50 हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. तसेच शाळेला जाणार्‍या विद्यार्थ्याचेही नुकसान होत आहे.

पावसाळ्यात खंडेराजुरी गावासोबतचा संपर्क तुटतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परिक्षा देत आली नाही. गेल्या 2 वर्षांच्या पावसाळ्याच्या कालावधीत रूग्नवाहीका आत येऊ शकत नसलेमुळे येथील रुग्णांचा उपचाराविना जागेवरच मृत्यु झालेच्या घटना घडल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करता हा रस्ता डांबरीकरण होणे गरजेचे आहे. आंदोलनाची दखल घेवून तात्काळ रस्त्यांचे काम सुरु करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात विनोद मोरे, गजानन रुकडे, रंगराव पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.