Sunday, February 5, 2023

अण्णासाहेब पाटलांची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं ; मेटेंचा गंभीर आरोप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून उद्या म्हणजेच ५ जूनपासून राज्यात मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला सुरूवात होणार आहे. यासंबंधी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. उद्याचा मोर्चा हा 100 टक्के निघणार असून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

1982मध्ये मराठा आरक्षणासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. पण काँग्रेसने त्यांच्या मागण्यांचा साधा विचारही केला नाही. अण्णासाहेब पाटलांची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणांसदर्भात बळी घेण्याचं पहिलं काम काँग्रेसनं केल आहे. हा माझा आरोप आहे असे विनायक मेटे यांनी म्हंटल.

- Advertisement -

दरम्यान, उद्याचा मोर्चा हा मुका मोर्चा नसेल तर तो बोलका असेल. सरकारच्या चूका दाखवणारा असेल. उद्या आम्ही आमची भूमिका जाहीर करू. उद्या मोर्चाला येताना कोणी अडवलं तर त्यांना आम्ही परत मोर्चात आणण्याचं काम करणार असेही विनायक मेटे यांनी स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.