राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा त्यांचे धोतर फेडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा धोतर फेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

विनोद पाटील म्हणाले, राज्यपालांना छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात त्यांनी नाक खुपसू नये. आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. आपलं वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते,” असे विनोद पाटील म्हणाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी आवाहन करतो की तात्काळ या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही सर्व शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही’, असा इशारा विनोद पाटलांनी दिला आहे.