Sunday, March 26, 2023

धक्कादायक! 71 वर्षीय आजीला समोर बसवून 3 नातवंडांवर केला बलात्कार, धक्क्याने आजीचा झाला मृत्यू

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नताल प्रांतात असे अशी घटना घडली आहे जी संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. येथे एका 71 वर्षीय महिलेच्या घरात घुसून काही लोकांनी तिच्या तीन नातवंडांवर बलात्कार केला. सर्वात भयंकर गोष्ट हि आहे कि या बलात्काराच्या वेळी त्या लोकांनी या महिलेला तिच्या नातवंडांवर बलात्कार होताना पाहण्यास भाग पाडले. या घटनेमुळे त्या महिलेला इतका धक्का बसला की तिचा मृत्यू झाला.

डेली मेलच्या वृत्तानुसार, किती लोक घरात घुसले हे अजून कळालेले नाही, मात्र मुलींच्या म्हणण्यानुसार, बलात्कार करणारा माणूस एकच होता. हल्लेखोरांनी 19, 22 आणि 25 वर्षांच्या तीन मुलींना एका खोलीत बंद केले. यानंतर त्याने 71 वर्षीय महिलेला खोलीत खेचत आणले आणि तिला खुर्चीवर बांधले. यानंतर बंदुकीच्या धाकाने त्या व्यक्तीने तिन्ही मुलींवर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झालेल्या घटनेमुळे सदर महिला बेशुद्ध पडली होती आणि नंतर त्यांनी तिला मृत घोषित केले.

- Advertisement -

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
घरातून कोणतेही सामान चोरीला गेलेले नसल्यामुळे हे वैयक्तिक वैर असल्याचे प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मुलींवर बलात्कार करून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. पोलिस प्रवक्ते नाकोबिल ग्वाला म्हणाले की, आरोपीची ओळख पटलेली नाही. मुलींनी सांगितले की, हल्लेखोरांनी कपड्याने आपला चेहरा झाकून टाकला होता. त्यांनी सांगितले की घटनेच्या वेळीच त्यांची आजी बेशुद्ध झाली होती.

जेव्हा त्या मुलींचे वडील घरी पोहोचले तेव्हा त्यांना संपूर्ण घटनेची माहिती मिळाली आणि त्याने पोलिसांना बोलावले. दक्षिण आफ्रिकेत सोशल मीडियावर या विषयावर बरीच चर्चा होते आहे. प्रांतिक सरकारच्या प्रवक्त्या नोलान्हा खोजा यांनी लोकांना असे आश्वासन दिले आहे की दोषींना लवकरात लवकर शिक्षा केली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.