विक्रमी पावसानंतर मेघालयातील मावसिनराममध्ये निसर्गाने केले रौद्र रूप धारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिलाँग : वृत्तसंस्था – मागच्या आठवड्यात पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाने (record rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात तर विक्रमी पाऊस (record rain) झाला आहे. मेघालयातील मावसिनराम या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस (record rain) पडतो. या ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तेथील एका धबधब्याचा आहे. व्हिडीओ पाहताना तुम्हाला ढग खाली आल्याचा भास होईल. मात्र हे ढग नसून धबधबा आहे. तेथे गेलेल्या एका पर्यटकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला आहे. धबधब्याचा प्रवाह इतका जोरात आहे की, तेथून गाडी जाणंही अवघड झालं आहे.

काही अहवालांनुसार, गेल्या 81 वर्षांत मावसिनराममध्ये 24 तासांच्याकालावधीत नोंदलेला हा सर्वाधिक पाऊस (record rain) आहे. गेल्या तीन दिवसांत आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसामुळे (record rain) 39 लोकांचा मृत्यू झाला आहे. या पावसाळ्यात एकूण 91 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील पुरामुळे 26 लाख लोकांना याचा फटका बसला आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांचे मेघालय समकक्ष कॉनरॅड संगमा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. पुढील दोन दिवस या भागात पाऊस (record rain)  पडण्याची दाट शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा :
किरकोळ कारणातून रिक्षावाल्याने थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली

महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे करुणा शर्मावर गुन्हा दाखल

FIR नसलेल्या युवकालाच सैन्य भरतीत घेतले जाणार, प्रमाणपत्रही लागणार द्यावं; तिन्ही सेना दलाची मोठी घोषणा

राष्ट्रवादी ही लुटारू सरदाराची टोळी, माझ्याविरोधात कटकारस्थानच; हॉटेल उधारीवरून सदाभाऊंचा हल्लाबोल

कॅमेऱ्यापलीकडे कधीही बघत नव्हते मग सेनेशी संबंध कसा? राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Leave a Comment