Saturday, March 25, 2023

अबब !!! या आजीनं चक्क 85 फूट उंच पोलवर केला डान्स, VIDEO VIRAL

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एखादी कला आणि कसब लोकांसमोर सादर करणे ही काय सोपी गोष्ट नाही. त्यातही वयाच्या 81 व्या वर्षी जर कोणी डान्स करून लोकांचं मनोरंजन करत असेल तर मात्र ती व्यक्ती कोणी साधी व्यक्ती असू शकत नाही. अशातच एका 81 वर्षांच्या महिलेनं चक्क 85 फूट लांब असलेल्या पोलवर चढून डान्स केला. त्यांच्यातली ऊर्जा आणि चैतन्य पाहून प्रेक्षकानाही आश्चर्य वाटले. हा थरारक अनुभव पाहून उपस्थितांच्या अंगावर काटा आला. 81 वर्षीय कार्ला वलेन्डाने 85 फूट लांबीच्या या पोल डान्सला उपस्थितांनी कडक सॅल्युट केला आहे.

- Advertisement -

 

स्टीव हार्वे यांचा शो लिटिल बिग शॉट्स: फॉरएव्हर यंग यामध्ये या महिलेची करामत पाहून प्रेक्षकांच्या काळजात धस्स झालं आणि त्यांचं कौतुकही वाटलं. या शोमध्ये वयोवृद्ध देखील सहभागी होत असतात. त्यांच्या कला, डान्स इत्यादी सादर करून दाखवतात. 81 वर्षांच्या महिलेनं कमाल पोल डान्स केला आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कार्ला वालेंडा म्हणल्या की ‘यातून मी लोकांचं मनोरंजन करते. धाडसी असलं तरीही मला हे करायला आवडतं. मी वयाच्या 3 वर्षांपासून पोल डान्स करते