कोरोना विरोधात विराट कोहली मैदानात; केली तब्बल ‘एवढी’ मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः उद्रेक केला असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने पुढाकार घेतला आहे. या दोघांनी मिळून केट्टो (ketto) या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निधी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी सोशल मीडियावर या दोघांनी एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी ७ कोटींचा निधी गोळा करण्यात येणार असून विराट आणि अनुष्काने मिळून दोन कोटींची मदत केली आहे.

भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतो आहे. देशातल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण आहे, तिच्यासमोर काही आव्हानं आहेत. ज्या परिस्थितीतून लोक जात आहे ते पाहून माझं हृदय तुटतंय. त्याचमुळे विराट आणि मी केट्टोबरोबर #InThisTogether या मोहिमेद्वारे मदत निधी गोळा करणार आहे, आणि जमा झालेला निधी कोरोनाविरोधी लढ्यासाठी देणार आहोत, असं विराट-अनुष्काने केलेल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like