विराट कोहलीने २५ वर्षांनंतर रचला हा इतिहास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माऊंट मोनगानुई | टीम इंडियाने कांगारूनंतर न्यूझीलंडच्या संघावर सोमवारी सलग तिसरा विजय मिळवला. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडला नमवित पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तब्बल १० वर्षानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. या बरोबरच कर्णधार विराट कोहलीने एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.

विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिले ३ सामने जिंकले. अशी किमया या आधी पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिकच्या या नेतृत्वात पाकिस्तानच्या संघाने केली होती. पाकिस्तानच्या सलीम मलिकने १९९४ च्या दौऱ्यात सलग तीन एकदिवसीय सामने जिंकले होते. त्यानंतर कोणत्याही आशियाई कर्णधाराला हे शक्य झाले नव्हते. पण विराटने २५ वर्षानंतर हा पराक्रम केला. न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत सलग तीन एकदिवसीय सामन्यात पराभूत करणारा विराट दुसरा आशियाई कर्णधार ठरला.

दरम्यान, सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेले २४४ धावांचे आव्हान भारताने सहज पूर्ण केले. विराट आणि रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करीत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. रोहितने ६२ तर कोहलीने ६० धावा झळकावल्या. यानंतर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक या जोडीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

इतर महत्वाचे –

हार्दिक पांड्या करणार आता बँकिंग परीक्षेचा अभ्यास ??

विराट-अनुष्का फेडररच्या भेटीला

महाराष्ट्राची कुस्ती ग्लॅमरस होतेय…

Leave a Comment