जिंकलो भावांनो!! एजाज पटेलचं अभिनंदन करण्यासाठी द्रविड- कोहली न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूम मध्ये; जिंकली सर्वांची मने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध च्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वच्या सर्व 10 बळी घेत नवा विश्वविक्रम केला आहे. सर्व जगभरातुन एजाज पटेल चे अभिनंदन होत असतानाच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी थेट न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूम मध्ये जात एजाज पटेल चे अभिनंदन केले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाज मोहम्मद सिराज हे थेट किवी ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले आणि त्यांनी तिथे जाऊन एजाझ पटेलचे अभिनंदन केले. विराट, राहुल व सिराजचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीचं सारेच कौतुक करत आहेत.

दरम्यान, एजाज पटेलने भारताविरुद्ध च्या दुसऱ्या कसोटीत 47.5 षटके टाकली आणि 12 षटके निर्धाव टाकत 119 धावांत 10 विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. १४१ वर्षांच्या कसोटी इतिहासात एका डावात १० बळी घेणारा एजाज पटेल हा जगातील फक्त तिसरा गोलंदाज आहे. कुंबळे आणि एजाजव्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता

You might also like