हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात आघाडीच्या भारतीय फलंदाजांची तारांबळा उडाली असताना भारतीय फलंदाजीच्या शेपटाने मात्र ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले. मुंबईकर शार्दूल ठाकूर आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांनी धैर्याने फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवली.
एकवेळ भारताच्या 6 विकेट अवघ्या 186 धावांवर गमावल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चकित केले आणि चांगलीच फटकेबाजी केली. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली ब्रिस्बेन कसोटीच्या तिसर्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी गबाच्या वेगवान आणि तेजीतील खेळपट्टीवर चमत्कार केले.
शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या या बॅटिंगवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मराठमोळी प्रतिक्रिया दिली आहे. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरची उत्कृष्ठ खेळी. हेच टेस्ट क्रिकेट आहे. पदार्पणाच्या टेस्टमध्येच वॉशिंग्टनने संयमी खेळी केली. शार्दुल तुला परत मानलं रे, असं ट्विट विराटने केलं आहे.
Outstanding application and belief by @Sundarwashi5 and @imShard. This is what test cricket is all about. Washy top composure on debut and tula parat maanla re Thakur! 👏👌
— Virat Kohli (@imVkohli) January 17, 2021
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’