ऑस्ट्रेलिया विजयानंतर क्रिकेटपटू टी नटराजन यांचे गावात जंगी स्वागत! सेहवागने केला व्हिडिओ शेअर

सालेम । भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिकल्यानंतर भारतीय संघातील क्रिकेटपटूंचे त्यांच्या शहरात आणि गावात जोरदार स्वागत केले जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाकडून वनडे, टी-२० आणि कसोटीत पदार्पण करणाऱ्या टी नटराजन याचेही खास स्वागत करण्यात आले. भारताच्या या गोलंदाजाचे पदार्पण जसे खास ठरले तसेच त्याचे स्वागत देखील हटके ठरले.

ऑस्ट्रेलियात मालिका विजयानंतर भारतात पोहोचलेला नटराजन सालेम येथील चिन्नाप्पमपट्टी गावात पोहोचला. यावेळी नटराजनला चक्क रथामध्ये बसवण्यात आले आणि मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती यावरून नटराजनची लोकप्रियता किती वाढली आहे याची कल्पना येते.

एका छोट्या गावातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या नटराजनच्या या यशाबद्दल गावातील लोकांना प्रचंड मोठा आनंद झाला होता. सर्व जण नटराजन, नटराजन अशा घोषणा देत होते. त्याच्या स्वागतासाठी उपस्थित चाहते फोटो आणि व्हिडिओ शुट करत होते. गावातील लोकांनी ढोल-ताशात नटराजनला घरापर्यंत सोडले. नटराजनच्या या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने देखील हा व्हिडिओ शेअर करत त्याचे कौतुक केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like