WTC फायनल पूर्वी विरुचा रोहितला मोलाचा सल्ला ;म्हणाला की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जुन दरम्यान होणार असून संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली असली तरी फायनल मध्ये न्यूझीलंडचं कडवं आव्हान असणार आहे.

दरम्यान भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मावर खूप मोठी मदार असणार आहे. रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्मात असला तरी इंग्लिश परिस्थितीत नव्या बॉल वर खेळताना रोहितला सावध राहुन खेळावं लागेल. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने रोहितला हाच सल्ला दिला आहे.

डावाच्या सुरुवातीला चेंडुचा आदर करावा असा सल्ला विरुने रोहितला दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की, ‘इंग्लंडमध्ये खेळत असताना रोहितने नव्या चेंडुचा आदर करायला हवा. त्याच्याकडे अनुभव भरपुर आहे. मात्र ५-१० षटके खेळुन काढावी आणि एकदा खेळपट्टीवर स्थिरावला की हवे तशे फटके खेळु शकतो’ असा सल्ला सेहवागने दिला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment