शोलेच्या विरूने चाहत्यांना दिला फिटनेसचा कानमंत्र; व्हिडीओ झाला वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अर्थात प्रेक्षकांचा शोले चित्रपटातील लाडका विरु आज अभिनयक्षेत्रापासून दूर असले तरी सोशल मीडियावर मात्र आपल्या चाहत्यांच्या चंगलेच संपर्कात आहेत. ते सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी ते त्यांचे अनेक फोटो आणि विविध व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना कधी किस्से तर कधी गुपित सांगतात. धर्मेंद्र आजही आधीइतकेच फिट अँड फाईन आहेत. त्यामुळे यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांना त्यांच्या फिटनेसचे रहस्य काय आहे हे सांगणारा एक खास कानमंत्र देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

अभिनेता धर्मेंद्र यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ते स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत. या पोस्टसोबत त्यांनी लिहिले आहे की, मी योगा आणि काही व्यायामांसोबतच पाण्यातील एरोबिक्स सुरू केला आहे.

https://www.instagram.com/p/CCdY-k3nYr0/?utm_source=ig_web_copy_link

आरोग्य जपणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. हा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चांगलाच व्हायरल झाला आहे. मुख्य म्हणजे त्यांचे चाहते त्यांचा या वयातील असा उत्साहवर्षक चेहरा आणि व्यायामाविषयी अर्थात फिटनेस विषयी असणारे प्रेम पाहून त्यांचे अगदी भरभरून कौतुक करत आहेत.

https://www.instagram.com/p/CC07PAbn8Lv/?utm_source=ig_web_copy_link

पंजाबच्या लुधियाना शहरातील नुसराली या गावी धरमसिंग देओल यांचा जन्म झाला. केवल किशनसिंग देओल आणि सत्वंत कौर हे त्यांचे आई-वडील. लुधियानाच्या गव्हर्नमेंट सिनिअर सेकंडरी स्कूल आणि फगवारा येथील रामग्रहीय कॉलेजमध्ये धर्मेंद्र यांचे शिक्षण झाले. पुढे अभिनयाच्या ओढीने ते इंडस्ट्रीकडे वळले.

https://www.instagram.com/p/B9-yCq7nktP/?utm_source=ig_web_copy_link

तसे पाहता धर्मेंद्र यांच्या कुटुंबातून फिल्म इंडस्ट्रीत कुणीच कार्यरत नव्हते. या इंडस्ट्रीत त्यांचा कोणी गॉडफादर देखील नव्हता. पण त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षीच त्यांनी फिल्मफेअर’चा न्यू टॅलेंट अ‍ॅवॉर्ड पटकावला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

Leave a Comment