अण्णा हजारे कुठून येवढा उत्साह आणतात देव जाणे; विश्वंभर चौधरी राळेगणमध्ये दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक निष्ठावान सैनिक ते समाजसुधारक असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांनी भेट घेतली. यावेळी दोघांच्यात राज्यात आणि केंद्रात सुरु असलेल्या घडामोडींवर चर्चा झाली. वय 85 असूनही अण्णा कुठून येवढा उत्साह आणतात देव जाणे !, असे भेटीनंतर फेसबुक पोस्ट करतात चौधरी यांनी म्हटले.

अण्णा हजारे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामधून त्यांनी अण्णांबाबत आणि राळेगणबाबत आपली मनातील भावना व्यक्त केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, आज अण्णांची राळेगणमध्ये जाणून भेट घेतली. यावेळी पहिले की, अण्णांनी राळेगणमध्ये येणार्‍या लोकांसाठी गॅलरी केली आहे तसेच तिचा विस्तार केला, तो अण्णांनी स्वतः येऊन मला दाखवला. यावेळी मी त्यांना म्हणालो की, अण्णा आराम करा, मी जाऊन येईन पण अण्णांचा उत्साह अपार असतो.

अण्णांची तयार केलेल्या गॅलरीत त्यांनी जलसंधारण आणि ग्रामविकासाचे टप्पे नव्याने दाखवले आहेत. वेगवेगळ्या बंधार्‍यांची तांत्रिक माहिती त्यातून दिली आहे. एक नवी गॅलरीपण अण्णांनी केली आहे, ज्यामध्ये फक्त आंदोलनांची सचित्र गाथा आहे.

https://www.facebook.com/100001297110601/posts/pfbid023Z5WipKo6LHTHsAcsqujMAGn1CeiWnwGHMdp5FwQMuqgnKWginswS5JWadaVQQv3l/

यावेळी मला अण्णा शाळेत सुद्धा घेऊन गेले आणि म्हणाले की, ही नापास मुलांसाठीचीच शाळा आहे. या शाळेत नापास असेल तरच प्रवेश मिळतो. त्यावेळी मी पाहिलं की, त्या ठिकाणी असणारी मुलं वस्तीगृहात जेवत होती तर घरून डबा आणणारी मुलं पटांगणात जेवत बसली होती. मलाही खूप छान वाटलं बागडणारी मुलं पहायला. अच्युतराव पटवर्धन यांच्या नावे जे शिक्षण संकुल आहे ते अण्णांनी स्वतःच्या वडिलोपार्जित चार एकरवर उभं आहे. ती जमीन अण्णांनी संस्थेला देऊन टाकली आहे.

राळेगणला यंदा पाऊस नाही. पण जेवढा पडला त्यातून 2 कोटी लिटरचं शेततळं भरलेलं आहे. त्यातूनच शाळा आणि वसतिगृहाची गरज भागते. अण्णांच्या भेटीवेळी माझ्यासोबत दादाभाऊ पठारे आणि नानाभाऊ आवारी संपूर्ण वेळ सोबत होते. आणि हो, नागपंचमी असल्यामुळे पुरणाची पोळी, कटाची आमटी, असा जोरदार बेत जेवणात आखला होता. त्या पुरणपोळ्या हाॅस्टेलच्या मुलांच्या फोटोत दिसतील, असे शेवटी चौधरी यांनी म्हंटले आहे.