व्हिडिओ: आता भारतातही घ्या युरोपातील ट्रेन प्रवासासारखा आनंद; भारतीय रेल्वेने केली ‘विस्टाडोम कोच’ची निर्मीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई । भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि पर्यटानाच्या संधी वाढत जाव्यात हा उद्देश समोर ठेवून विस्टाडोम कोचची निर्मीती केली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या कोचचा व्हिडीओ ट्विट करत या कोचमधून प्रवास करणं म्हणजे प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल, असं म्हटलं आहे. भारतीय रेल्वेने तयार केलेला हा विस्टाडोम कोचमध्ये एखाद्या युरोपातील ट्रेन कोणच्या तोडीचा आहे.

या कोचाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची छत. विस्टाडोम कोचची छत काचेची असून तुम्हाला प्रवासादरम्यान आकाशाच्या बदलत्या छटांचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय कोचच्या खिडक्या ह्यासुद्धा काचेच्या आहेत. ज्यामुळं तुम्हाला प्रवासादरम्यान भारताच्या विविध भागाचे दर्शन अगदी ठळकपणे होणार आहे.

या कोचमधील आसन युरोपातील कोचप्रमाणेच ३६० अंशात वळवता येतात. जेणेकरून प्रवासादरम्यान तुम्हाला तुमच्या सोयीने तोंड करून बसता येईल. प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक असणार्या सर्व सोयीसुविधासोबत इतरही अनेक सुविधा या कोचमध्ये देण्यात आल्या आहेत.चला तर हा कोच नेमका कसा दिसतो ते पाहुयात खाली दिलेल्या व्हिडिओत.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment