विठ्ठल-रूक्मिणीचे देऊळबंद ः जोतिबांची चैत्र यात्रा व महालक्ष्मीचा रथोत्सवही रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून राज्य शासनाने धार्मिक स्थळे मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 30 एप्रिल पर्यंत भाविकांसाठी पंढरपूरचे विठल- रूक्मिणी तसेच कोल्हापूरचे महालक्ष्मी आणि ज्योतिबा देवाचे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या देऊळबंद झाली असल्याने या महिन्यात 26 एप्रिल रोजी होणारी श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा आणि 27 एप्रिल रोजी होणारा श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळाही रद्द करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यातच कोरोनामुळे मंदिरे बंद ठेवण्यात आलेली होती. त्यानंतर काही काळाने प्रभाव कमी होताच, मंदिराची दरवाजे उघडले होते. तेव्हा केवळ याठिकाणी मुखदर्शन मिळत होते, त्यामुळे काहीसे भाविक नाराज होते. परंतु आता पूर्ण मंदिराचे दरवाजे बंद होऊन देऊळ बंद झाल्याने भाविकांना दर्शन मिळणार नाही. तसेच सध्याचा निर्णय 30 एप्रिलपर्यंत घेण्यात आला असला तरी कोरोनाच्या प्रभावावर पुढचा निर्णय अवलंबून असणार असल्याचे निश्चित आहे.

राज्य शासनाने वीकेंड लाॅकडाऊकडून जाहीर केला असला, तरी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहेत. त्यानुसार विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीची ऑनलाईन बैठक झाली. त्यामध्ये 30 एप्रिल पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी पूर्ण बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. सध्या 30 एप्रिल पर्यंत मंदिर बंद राहणार असल्याने भक्तांना दर्शनापासून मुकावं लागणार आहे. गतवर्षी मार्च महिन्यातचं कोरोना वाढला असल्यामुळे महाराष्ट्रातील आराध्य दैवत असलेले तिन्ही मंदिरे बंद करण्यात आलेली होती.

Leave a Comment