Vivo V40e Launched : 8GB रॅम, 50 MP कॅमेरासह Vivo V40e ची बाजारात एंट्री; किंमत किती पहा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विवो कंपनीने भारतीय बाजारात Vivo V40e नावाचा नवा स्मार्टफोन लाँच (Vivo V40e Launched) केला आहे. 8GB रॅम, 50 MP कॅमेरासह विवोच्या या मोबाईल मध्ये अनेक भन्नाट फिचर देण्यात आली आहेत. या मोबाईलची किंमतही बजेट मध्ये आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून ते फ्लिपकार्ट आणि विवो इंडियाच्या ई-स्टोअरवरून खरेदी करता येईल. आज आपण विवोच्या या नव्या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन, कलर आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

6.77-इंच डिस्प्ले –

Vivo V40e मध्ये 120 Hz चा रिफ्रेश रेटसह 6.77-इंचाचा फुल HD प्लस 3D कर्व्ह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1,080 x 2,392 पिक्सेल रिझोल्यूशन आणि HDR10 Plus सपोर्ट मिळतो. खास बाब म्हणजे या डिस्प्लेला वेट टच फीचर देण्यात आलं आहे, म्हणजेच काय तर ओल्या हातांनी सुद्धा तुम्ही मोबाईल अगदी व्यवस्थित हॅन्डल करू शकता. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimension 7300 प्रोसेसर बसवला असून विवोचा हा मोबाईल Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो. मोबाईल मध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळते. मोबाईलला IP64 रेटिंग मिळाले आहे, म्हजेच धुळ आणि पाण्यापासून कोणताही धोका नाही.

कॅमेरा – Vivo V40e Launched

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo V40e मध्ये पाठीमागील बाजूला ड्यूअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 MP चा मुख्य कॅमेरा आणि 8 MP चाअल्ट्रा-वाइड कॅमेरा उपलब्ध आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी मोबाईलच्या समोर 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळतोय. या दोन्ही कॅमेराच्या माध्यमातून 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल असा दावा केला जात आहे. स्मार्टफोन मध्ये 5,500mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 80W च्या वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Vivo V40e ची च्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत 28,999 रुपये आहे तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन मिंट ग्रीन आणि रॉयल ब्रॉन्झ कलर पर्यायांमध्ये लाँच (Vivo V40e Launched) करण्यात आला असून 2 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट आणि विवो इंडियाच्या ई-स्टोअरवरून खरेदी करता येईल. या मोबाईल खरेदीवर HDFC आणि SBI कार्ड वापरकर्त्यांना 10 टक्के झटपट सूट देखील दिली जाईल.