माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने केलं सतनाच्या एका शेतकऱ्याचे कौतुक; हे आहे कारण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशातील सतना येथील शेतकरी बाबूलाल दहिया मंगळवारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण बाबूलाल दहिया यांच्या कामापासून प्रभावित झाला आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण याने ट्विट करत बाबूलाल दहिया यांची प्रशंसा केली आहे. दहिया त्यांच्या शेतीतील नवीन प्रयोगांसाठी ओळखले जातात. बाबूलाल दहिया यांच्या कार्याची दखल घेत व्हीव्हीएस लक्ष्मणने त्यांचे कौतुक केलं आहे.

सतना येथील शेतकरी बाबूलाल दहिया यांना गेल्या वर्षी सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले होते. बाबूलाल मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील पिथौराबाद गावचे रहिवासी आहेत. शेतीप्रती त्यांची समजूत व वैज्ञानिक दृष्टीकोन व्यापक आहे. त्यांनी आपल्या शेतात 125 प्रकारचे देशी धानाच्या जाती साठवल्या आहेत. आपल्या सीड बँकमधून तो इतर शेतकर्‍यांना बियाणेदेखील पुरवतो.

व्हीव्हीएस लक्ष्मण यांच ट्विट
माजी क्रिकेटपटू लक्ष्मण यांना त्यांच्या ट्विटमध्ये उल्लेख करत बाबूलालच्या कार्याचे कौतुक केले गेले आहे. लक्ष्मण यांनी लिहिले,”बाबूलाल दहिया पर्यावरण वाचवण्यासाठी विलक्षण काम करत आहेत. रासायनिक खताचा वापर न करता त्यांनी आपल्या शेतात पारंपारिक 110 प्रकारच्या भाताची लागवड केली आहे.”

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment