सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहराजवळ असणाऱ्या वाढे गावा लगत असणाऱ्या वेण्णा नदीचे पात्र बदलण्याचा प्रयत्न अचानक काही लोकांकडून सुरू होता. या नदीपात्रात पोकलेनच्या साह्याने गाळ उपसण्याचे काम सुरूहोते. हि गोष्ट वाढे गावातील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. कोणतीही प्रशासकीय मान्यता न घेता हे नदीचे पात्र बदण्याचा सुरु असलेल्या या प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतल्याची घटना सोमवारी घडली.
सातारा जिल्ह्यातील वाढे या गावालगत वेण्णा नदी असून या नदीपात्राच्या दुसऱ्या बाजूस खेड हे गाव आहे. या दोन्ही गावाच्यामध्ये असलेल्या नदीपात्रावरून सोमवारी मोठा वाद निर्माण झाला. नदीपात्रातून गाळ उपसून नदीपात्रच वळवण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याशी शंका वाढे गावातील ग्रामस्थांना आली. यावेळी गावातील ग्रामस्थांनी थेट नदीपात्रात उतरून ज्या ठिकाणी गाळ उपसून नदीपात्राचे खुदाई काम सुरु होते ते बंद पाडले. यावेळी मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रशासकीय मान्यता न घेताच वेण्णा नदीचे पात्र बदलण्याचा प्रयत्न ; वाढे गावाच्या ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा pic.twitter.com/z5i98IT5vx
— santosh gurav (@santosh29590931) March 27, 2023
ज्यांनी कोणी नदीपात्राची खुदाई करून नदीतील पाण्याचा प्रवाह वळवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी प्रशासनाची परवानगी घेतली आहे का? असा सवाल वाढे येथील ग्रामस्थांनी केला आहे. नदीपात्राच्या उत्तखननामुळे वाढे गावातील घरांना मोठा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे या विरोधात वाढे येथील ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर हे काम थांबविण्यात आले.