पुसेसावळी | वडगाव ज. स्वा येथील सिध्दनाथ, माता जोगेश्वरी यात्रा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने पूजा करून साजरी करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोरोनाच्या अटी पाळून यात्रा साजरी होत आहे.
मंदिराला यात्रेसाठी डिजिटल विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे सिध्दनाथ मंदिर आकर्षक ठरत आहे. संपूर्ण गावांसह सिध्दनाथ मंदिरात परंपरेनुसार घट बसविले जातात. याच दिवशी उपवास प्रारंभ होतो. उपवास काळात मंदिरात सकाळ संध्या काळी पूजा, आरती, कीर्तन, काकडा, आरती, मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू असते. घट बसविल्यापासून दररोज पंचारती असते. दरम्यान याच काळात दररोज श्री सिध्दनाथ देवाची व माता जोगेश्वरीची विविध पोषाखातील पूजा बांधली जाते.
शनिवार दि. 19 रोजी यात्रेचा सोहळा गुरुवर्य विठ्ठलबुवा गुरु गोसावी व दादा पुजारी यांचे हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, सुनिल माने, प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, धैर्यशिल कदम नंदकुमार मोरे, जितेंद्र पवार, शिवाजी सर्वगोड, भाग्यश्री भाग्यवंत, सुनिता कदम, जयश्री कदम रेखा घार्गे, शिवाजी सर्वगोड, संतोष घार्गे, सुरेश कदम आदीसह उपस्थित रहाणार आहेत.
तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सोहळयास उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा कमेटीचे अध्यक्ष सुरेश घार्गे व यात्रा कमेटी उपाध्यक्ष अशोक घार्गे यांनी केले आहे.