हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह आणि टीम इंडियाचा माजी सलामीवीर वासिम जाफर (Wasim Jaffer) मोठ्या वादात सापडला आहे. वासिम जाफरने उत्तराखंड क्रिकेट संघाचं प्रशिक्षक म्हणून काम पाहताना टीममध्ये धर्माच्या आधारावर खेळाडूंची निवड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उत्तराखंड क्रिकेट संघाने केला आहे. पण दुसरीकडे वसीम जाफरने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
वासिम जाफरने 9 फेब्रुवारीला उत्तराखंड क्रिकेट टीमच्या (Uttarakhand Cricket Team) प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. मात्र याच संघाने जाफरवर धार्मिक सहानुभूती दाखवल्याचा, संघनिवडीदरम्यान मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव माहिम वर्मा यांनी हा आरोप केला आहे. इतकंच नाही तर वासिम जाफरने संघातील खेळाडूंना जय श्रीराम आणि जय हनुमानच्या घोषणा देण्यापासूनही रोखल्याचा आरोप आहे. मात्र हे सर्व आरोप जाफरने फेटाळले आहेत.
या प्रकरणाला जो काही धार्मिक रंग दिला जात आहे, ते खूप दु:खद आहे. मी इक्बाल अब्दुल्लाचं समर्थन करतो आणि त्याला कर्णधार बनवू इच्छित होतो, हा त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे,’ असं जाफर ऑनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाला.
उत्तराखंड टीमच्या सराव सत्रात मौलवींना आणल्याचा आरोपही जाफरने फेटाळून लावला आहे. ‘बायो बबलमध्ये मौलवी आले आणि आम्ही नमाज पठण केलं. मौलवी, मौलाना देहरादूनच्या शिबिरात दोन-तीन शुक्रवार आले, पण त्यांना मी बोलावलं नव्हतं,’ असं स्पष्टीकरण जाफरने दिलं.
माहिम वर्मांचा आरोप काय?
माहिम वर्मांच्या आरोपानुसार, जाफर टीममध्ये धार्मिकीकरण करत असल्याचं खेळाडूंचं म्हणणं होतं. काही खेळाडू रामभक्त हनुमान की जय ही घोषणा देऊ इच्छित होते. मात्र जाफरने त्यांना रोखलं. इतकंच नाही तर काही दिवसांनी बायो-बबल ट्रेनिंगमध्ये एक मौलवी आले आणि त्यांनी मैदानात दोनवेळा नमाज पठण केलं. मात्र या ट्रेनिंगमध्ये एक मौलवी प्रवेशच कसे करु शकतात? मी खेळाडूंना आपल्याला आधी का सांगितलं नाही असा प्रश्न केला”