उरमोडी, वीर धरणातून पाणी सोडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील उरमोडी आणि वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असलेने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आज सकाळी दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.

उरमोडी धरणातील पाणी पातळी निर्धारित पाणी पातळीपेक्षा अधिक झाल्यामुळे सांडव्यावरील वक्रद्वारा मधून उरमोडी नदीपात्रात आज दि. 15 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता 2000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. उरमोडी नदीकाठावरील गावातील सर्व ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थ यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच ग्रामस्थ, शेतकरी इतर कोणीही कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये.

वीर धरण उजवा कालवा विद्युतगृहातुन 1400 क्युसेस व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 क्युसेस विसर्ग सकाळी 10.30 वाजता नदीपत्रात सुरू करण्यात आला आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून सध्या विसर्ग सुरू करण्यात येणार नाही. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो, याची नोंद घेण्यात यावी अशीची सूचना व्यवस्थापनाने केली आहे.

सातारा जिल्ह्यात सरासरी 14.80 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 14.80 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 362.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. 1) सातारा- 19.30 (363.80) मि. मी., 2) जावळी- 35.90 (610.40) मि.मी., 3) पाटण-32.10 (648.0) मि.मी., 4) कराड- 9.10 (261.90) मि.मी. 5)कोरेगाव-6.10 (194.20) मि.मी., 6) खटाव-2.10 (124.10) मि.मी., 7) माण- 0.50 (155.40) मि.मी., 8)फलटण- 0.30 (125.10) मि.मी., 9) खंडाळा- 0.60 (187.90) मि.मी., 10) वाई-6.00 (343.70) मि.मी., 11) महाबळेश्वर-74.60 (1549.00) मि.मी.,

Leave a Comment