बालदिन : कामेरी येथील सहा वर्षाच्या आरोहीने केला वजीर सुळका सर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा तालुक्यातील कामेरी येथील सहा वर्षाच्या आरोही सचिन लोखंडे हिने अवघ्या तीस मिनीटात शहापूर तालुक्यातील वजीर सुळका सर केला. ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला आहे, याच परीसरात असलेल्या 250 फुट उंच वजीर सुळका सर करण्यासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो.

बालदिनाचे औचित्य साधून वजीर सुळका धाडसी मोहिमेत आरोही लोखंडेनी भाग घेतला होता, सुळक्या जवळ जाण्यासाठी ओरोहीने रविवारी (दि. 14) पहाटे पाच वाजता माहुली किल्ला चढण्यास सुरुवात केली. सुळका पायथ्याशी तीन कि. मीटरचा डोंगर दोन तासात पार केला. सकाळी बारा वाजता वजीर सुळका चढण्यास सुरूवात केली. आरोहिने आर्ध्या तासात 250 फुटांची 90 अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई असलेला वजीर सुळका सर केला.

राँपलिंग आणि कँबलिंग हा ट्रेकिंग सहा वर्षाच्या आरोहिने सर केल्याने तसेच वजीर सुळका आरोहन धाडसी मोहिमेत उत्कृष्ट कामगीरी केल्यामुळे विशेष कौतूक करून प्रमाणपत्र मिळाले. वजीर सुळका सर करण्यासाठी पाँईट ब्रेक टिमचे जाँकी साळुंखे, समीर भिसे, चेतन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहिम राबली. यासाठी सचिन लोखंडे, राहुल घाडगे, नवनाथ घाडगे, भरत घाडगे, डाँ. संदिप भिंगारदिवे, संतोष निकम, अनुजा निकम, अजय गडांकुश, अक्षय पोळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Comment