‘सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवाचं!’ राजू शेट्टींचे खुलं चॅलेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात चांगलंच राजकारण रंगले आहे. अशा वेळी लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलाचे पैसे (electricity bill ) आम्ही भरणार नाही. आता सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी आमच्याकडून वीज बिलाची वसूली करुनच दाखवावी, असे जाहीर आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetti) यांनी दिले. राज्य सरकारने वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. वीज बिलं माफ केली नाहीत तर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करु, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील अनेक भागांतील नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांना वीजेची वाढीव भरमसाट बिले आली होती. यावरून गदारोळ झाल्यानंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजेची बिलं कमी केली जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरुन घूमजाव केले होते. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजेचे ३ महिन्यांचे बील सरकारने माफ केलेच पाहिजे. सरकारकडे त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. लॉकडाऊनच्या काळातील वीजेचे बिल सामान्य माणूस कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही, हे मी ठामपणे सांगतो. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकांकडून बिल वसूल करून दाखवावेच, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.

लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजेत. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले होते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment