हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून हवामानात मोठे चढ उतार होताना दिसतायत. सकाळी अतिशय थंडी आणि दुपारी उन्हाळ्याचा अनुभव मिळत आहे. पुढच्या पाच दिवसात तापमानात लक्षणीय घट होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यामध्ये तापमान 1-2 डिग्रीने घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या तापमानाच्या अंदाजात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांचा समावेश असणार आहे. तर चला या हवामान विभागाच्या अंदाजाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.
राज्यात थंडीचा जोर वाढू शकतो (Weather Update) –
सध्या अनेक भागात चक्रवाती वारे सक्रिय झाले आहे. त्यात भारतातील आसाम आणि आसपासच्या भागांचा समावेश आहे. ज्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. पश्चिमी विक्षोभ ( हवामानात होणारा एक तात्पुरता बदल ) आणि चक्रवाती हवेमुळे राज्यातील थंडीत चढ-उतार जाणवत आहे. पुढील तीन दिवसांत किमान तापमान 2-3 डिग्रीने घसरणार असल्याने राज्यात थंडीचा जोर वाढू शकतो , असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तापमानात 2-3 डिग्रीची घट –
मराठवाड्यात सध्या किमान तापमान 17-20 डिग्री सेल्सियस दरम्यान नोंदवले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 17.8 डिग्री आणि लातूरमध्ये 19.9 डिग्री सेल्सियस आहे. पुढील पाच दिवसांत या भागात तापमानात 2-3 डिग्रीची घट होईल आणि शुष्क वाऱ्यांचा जोर जाणवेल. मुंबईतील कोलाबा येथे शुक्रवारी किमान तापमान 21.2 डिग्री आणि सांताक्रूझ येथे 19.3 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. कोकण आणि गोवा भागांमध्येही तापमान कमी होईल, ज्यामुळे सकाळच्या गारव्यात वाढ होईल.
पाऊस पडण्याची शक्यता नाही –
राज्यात पुढील पाच दिवसांत शुष्क हवामान (Weather Update) राहण्याची शक्यता आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता नाही. तापमानात होणाऱ्या घटामुळे सकाळी थोडा गारवा जाणवेल, परंतु दुपारी उन्हाचा त्रास होऊ शकतो. नागरिकांना या बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
हे पण वाचा : पाऊस, धुके अन गारठा…. राज्यात हवामान बदलाचा इशारा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज