शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडला होता.
शिवसेना हे नाव देखील ठाकरे, शिंदे यांना वापरता येणार नसल्यानं शिवसैनिकां
च्यात
नाराजी पसरली होती.
आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्ह अन नाव दिली आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले आहे तर तलवार अन ढाल असे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे.
उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव तर मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
आता एकदम परफेक्ट काम झाले आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी चिन्ह मिळाल्यानंतर व्यक्त केली आहे.
मात्र तलवार अन ढाल हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला लाभकारी ठरणार काय हे आता आगामी निवडणुकीत मतदारच दाखवून देतील असे बोलले जात आहे.