अंजीर या फळामध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, लोह, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये वा मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
अंजीर खाल्ल्याने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
अंजिराच्या सेवनाने यकृताचे कार्य सुरळीत होते. शिवाय डांग्या खोकला, दमा अशा विकारांसाठी अंजीर खाणे फायदेशीर आहे.
अंजीरातील गरामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे नियमित ताजे अंजीर खाल्ल्याने शरीरातील हाडे आणि स्नायूंना मजबुती मिळते.
अंजीरमध्ये समाविष्ट असलेले ओमेगा ३ आणि ओमेगा ६ घटक मुबलक असतात. त्यामुळे हृद्याचे आजार नियंत्रणात राहतात.
अंजीरातील उच्च तंतुमय पदार्थ वजन कमी करण्यास मदत करतात.