भारतीय क्रिकेट टीम मधील अनेकजण आत्तापर्यंत अभिनेत्रींना पाहून त्यांच्यावर फिदा झालेत. कोणी जाहिरातीच्या निमित्ताने तर कोणी प्रमोशनच्या निमित्ताने या अभिनेत्रींना भेटले अन त्यांच्यातच हरवून गेले.

या क्रिकेटर्सचा जीव बॉलिवूड अभिनेत्रींनवर जडला अन त्यांनी त्याच्यासोबत लग्नही केलं 

विराट अन अनुष्काची जोडी तर नेहमीच चर्चेत असते. ते अनेकदा रोमँटिक फोटोही शेअर करत असतात. 

चक दे इंडिया चित्रपटतील अभिनेत्री सागरिका घाडगे हि सुद्धा २०१७ साली जहीर खान याच्यासोबत विवाह केल्यानंतर चर्चेत आली होती. 

युवराज सिंग याने ब्रिटिश अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत लग्न केलं. सध्या दोघंही आनंदी जीवन जगत आहेत.

हरभजन सिंग सुद्धा यामधून वाचू शकलेला नाही. बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा सोबत खूप दिवस रिलेशनशीप मध्ये राहून त्याने २०१५ साली तिच्यासोबतच विवाह केला. 

हार्दिक पांड्या एका पार्टीत अभिनेत्री नताशा स्टॅंकोव्हिकला भेटला अन त्यानंतर तिच्यामागे तो पूर्ण वेडाच झाला. २०१९ साली त्यांनी आपलं रिलेशनशिप स्टेट्स जाहीर केलं. सध्या त्यांना एक मुलगी देखील आहे.