माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. माथेरानला जाण्यासाठी नेरळ येथून जाणारी मिनी ट्रेन पर्यटकांसाठी मोठे आकर्षण असते.
मागील तीन वर्षांपासून नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन बंद ठेवण्यात आली होती. मात्र २२ ऑक्टॉबरपासून हि ट्रेन आता पुन्हा सुरु करण्यात आली आहे. matheran toy train booking
माथेरान हे महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पावसाळा, हिवाळ्यात इथे मोठ्याप्रमाणावर पर्यटक गर्दी करतात.
मिनी रेल्वेने माथेरानला जाण्याचा पर्यटकांचा अनुभव खूपच वेगळा असतो. अनेकजण खास या मिनी ट्रेनने प्रवास करण्यासाठी माथेरानला भेट देतात.
2019 साली माथेरान येथे अतिवृष्टी झाली होती. यामध्ये येथील रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले होते. अंतर ३ वर्ष मिनी ट्रेन बंद ठेवण्यात आली होती.
आता या सर्व रेल्वे रुळांचे काम पूर्ण झाले असून पर्यटकांसाठी मिनी ट्रेन आता पुन्हा सुरु झाली आहे.
यंदाच्या दिवाळीत पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानला व्हिजिट करत आहेत. तुम्हीही कुठे फॅमिली ट्रिप काढण्याचा विचार करत असाल तर माथेरानचा पर्याय उत्तम ठरू शकतो.